Wed. Jun 19th, 2024
sarthi

SARTHI SCHEME ll महाराष्ट्र राज्यातील युवकांना सारथीतून मिळणारे लाभ (महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा )

SARTHI SCHEME स्पर्धा परीक्षा संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा मार्गद

1.  सारथी संस्थेमार्फत नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत ५०० विद्याथ्यांना UPSC पूर्वपरीक्षेचे प्रशिक्षण घेण्यासाठी. प्रशिक्षण संस्थेचे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क सारथीमार्फत अदा करण्यात येते.
2. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र अर्थसहाय्य व मासिक विद्यावेतन अदा करण्यात येते. * संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी तसेच मुलाखतीसाठी पात्र होणा-या विद्यार्थ्याला आर्थिक सहाय्य करण्यात येते.
3. झूम मिटिंग तसेच अभिरूप मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी खास तज्ञ मार्गदर्शन करण्यात येते.
4.UPSC २०२० मध्ये २२ विद्याथ्यांची अंतिम यादीत निवड झाली. यापैकी ६ IAS, ८ IPS, व ३ IRS व ५ जणांची इतर सेवेला निवड झाली.
5. UPSC २०२१ मध्ये १२ विद्यार्थ्याची अंतिम यादीत निवड झाली. पैकी ४ जणांची IAS ला ४ जणाची IPS ला १ जणाची IRS ला व ३ जणांची इतर सेवेला निवड झाली.
6. UPSC २०१२ मध्ये १७ विद्याथ्यांची अंतिम यादीत निवड झाली आहे.

स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा मार्गदर्शन

1) पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत ७५० विद्यार्थ्यांना MPSC पूर्वपरीक्षेचे प्रशिक्षण. संपूर्ण प्रशिक्षण शुल्क, आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र अर्थसहाय्य व मासिक विद्यावेतन सारथीमार्फत अदा करण्यात येते.
2) MPSC मुख्य परीक्षेसाठी तसेच मुलाखतीसाठी पात्र होणा-या विद्यार्थ्याला आर्थिक सहाय्य करण्यात येते.
MPSC २०२० मध्ये ७० विद्याथ्र्यांची अंतिम यादीत निवड. यापैकी पहिल्या पाच मध्ये सारथी संस्थेचे चार विद्यार्थी आहेत व पहिल्या दहा मध्ये सारथी संस्थेचे सात विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झाली आहे.
3) MPSC २०१९ मध्ये १०३ विद्यार्थ्याची अंतिम यादीत निवड झाली आहे.

SARTHI SCHEME ll महाराष्ट्र राज्यातील युवकांना सारथीतून मिळणारे लाभ

इतर महत्वाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

A) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (न्यायिक सेवा) प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षण शुल्क, आकस्मिक खर्चासाठी स्वतंत्र अर्थसहाय्य व मासिक विद्यावेतन अदा करण्यात येते,
B)महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (अभियांत्रिकी सेवा) प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षण शुल्क व मासिक विद्यावेतन अदा करण्यात येते.
C)  दुय्यम सेवागट ब (अराजपत्रित) परीक्षा करिता निशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते.
D) विद्यापीठ अनुदान आयोगाच्या NET / MH SET परीक्षेचे पूर्व प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षण शुल्क व मासिक विद्यावेतन अदा करण्यात येते,
E) बैंकिंग पूर्व परीक्षा प्रशिक्षण प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षण शुल्क व मासिक विद्यावेतन अदा करण्यात येते.
F) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तांत्रिक सेवा, न्यायिक सेवा मुख्य परीक्षेसाठी तसेच मुलाखतीसाठी पात्र होणा-या विद्यार्थ्याला आर्थिक सहाय्य करण्यात येते.

SARTHI SCHEME

एम. फील. / पीएच. डी. करणा-या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती

1) मान्यताप्राप्त विद्यापीठाचे एम.फिल. किंवा पीएच.डी. करणारे पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात.
2) JRF साठी अधिछात्रवृत्ती रु. ३१,०००/- दरमहा व SRF साठी रु. ३५,०००/- दरमहा अधिछात्रवृत्ती, तसेच UGC नियमानुसार HRA, आकस्मिक खर्च अदा करण्यात येते,
3)  सदर योजनेअंतर्गत आज रोजीपर्यंत २१०९ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यात येत आहे.(SARTHI SCHEME)

सारथी कौशल्य विकास कार्याक्रम

1)  छत्रपती संभाजी महाराज सारथी चुंवा व्यक्ती महत्व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम (CSMS – DEEP) 2770 प्रशिक्षण केंद्रा अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व तालुकास्तरावर २०,००० प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण सुरु झाले आहे. (अतिशय महत्वाचे -हा कोर्से MKCL च्या MS-CIT अधिकृत प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध) (प्रशिक्षण केंद्र)
2) इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद अंतर्गत २४ प्रशिक्षण कार्यक्रमा करिता १५० प्रशिक्षणार्थी यांना औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), नागपूर, पुणे व कोल्हापूर येथे प्रशिक्षण सुरु झाले आहे.अधिक माहितीसाठी

जवळचे प्रशिक्षण केंद्र येथे पहा((CSMS – DEEP हा कोर्से करण्यासाठी थेट आमच्याशी संपर्क करा येथे क्लिक करा

नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

 3)  महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) अंतर्गत २०,००० विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्णपणे दिले जात आहे
महाराष्ट्रातील २४०० केंद्र अंतर्गत सर्व कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्याकरिता सामंजस्य करार करण्यात आलेला आहे . 4)  शासकीय तंत्रनिकेतन पुणे अंतर्गत मर्सडिझ बेंझ व यामाहा या कौशल्य विकास प्रशिक्षण प्रवेश गेणाऱ्या सारथीच्या लक्षितगटातील विद्याथ्र्यांची प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.(SARTHI SCHEME)

दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना परीक्षा

1)  इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्याथ्यांना सारथीमार्फत शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.
2)  पालकांचे आर्थिक उत्पन्न ३,५०,००० पेक्षा कमी असावे.
3) राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र सरकारची शिष्यवृत्ती रक्कम मिळत नसणाऱ्या
विद्याथ्यांना वार्षिक ९,६००/- अर्थसहाय्य करण्यात येते.
4)  सन २०२२-२३ मध्ये लक्षित गटातील २२.१२५ विद्याथ्यांना लाभ देण्यात आला आहे.

 सन २०२३ २४ मध्ये सारथीमार्फत घेण्यात येणारे काही उपक्रमः

1) अग्नीवीर भरती पूर्व- अनिवासी प्रशिक्षण देण्यासाठी कार्यवाही सुरु आहे.  2) राजर्षी शाहू राष्ट्रीय सार्वजनिक ग्रंथालय स्थापन करण्याचा मानस आहे.
3) प्रगत संगणक विकास केंद्र (C-DAC) द्वारे विद्यार्थ्यांना PRE CAT प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आले आहे.
4) बँकिंग परीक्षा (आय.बी.पी.एस.) २०२३ प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे.
5)सारथी भविष्यकालीन आराखडा (Vision Document – २०३०) अंतिम टप्यात आहे.
6) विभागीय मुख्यालय (नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर व लातूर) येथे ५०० मुले व ५०० मुलींसाठी वसतीगृह बांधकाम करिता जमीन विभागीय स्तरावर प्राप्त.
7) परदेशी भाषा शिक्षणाच्या अभ्यासक्रमाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे.
8)  डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सारथी उच्च शिक्षण देशांतर्गतील विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्तीची चालू करण्यात आलेली आहे
9)  नाशिक येथे मातोश्री मुलींचे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

कृषीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना

1) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) येथील IFAT, WBAT शैक्षणिक उपक्रमासाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना कार्यान्वित करण्यात येत आहे.
2)राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्राज्ञान संस्था NIPHT पुणे येथील ९ प्रशिक्षण शेताकार्याकरिता सुरु करण्याबाबत MoU करण्यात आला.
3) महाराष्ट्र सेंटर फॉर डेव्हलपमेंट ( MCDC) पुणे यांच्या मार्फत शेतकरी उत्पादन संस्था / कंपनी यांचे संचालक व CFO यांचा क्षमता चाचणी प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे.

सारथीमार्फत प्रकाशित करण्यात आलेले साहित्य

1) छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथाच्या ५०,००० प्रती सारथीमार्फत छपाई करण्यात आले आहे.
2) महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, महानगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती, पंचायत समिती कार्यालये, शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा, नगरपंचायती, नगरपालिका व शासकीय गंथालये यांना मोफत वितरीत करण्यात आले आहे. सदर सर्व योजना तपशीलवार पाहण्यासाठी सारथीच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या

वर्तमान भरती

अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या महाराष्ट्र ज्ञान मंडळ मर्यादित (MKCL) MS-CIT प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *